अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

निवडणूक आयोगाने आज, ३ ऑक्टोबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांतील सात जागांसाठी पोटनिवडणूका लागणार आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. एखाद्या आमदाराचे निधन झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत.

हे ही वाचा:

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी

‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

निवडणुक आयोगाच्या पत्रकानुसार ७ ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे सूचना जारी केली जाणार आहे. १४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतदान आणि ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक प्रक्रिया ८ नोव्हेंबरच्या आधी पूर्ण केली जाणार आहे.

Exit mobile version