27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणऋतुजा लटके यांचे भवितव्य मतपेटीत बंद, अंधेरीत झाले अल्पमतदान

ऋतुजा लटके यांचे भवितव्य मतपेटीत बंद, अंधेरीत झाले अल्पमतदान

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत काय होणार हे ६ नोव्हेंबरला कळणार

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभेच्या १६६- अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदार संघातून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह एकूण ७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे . या मतदार संघातून ऋतुजा लटके यांचा विजय सहज असल्याचे म्हटले जात आहे. परंतु निवडणुकीत कमी मतदान झाल्याचे चित्र बघायला मिळाले आहे . निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. या मतदार संघातील २५६ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजेपासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली.

या मतदार संघात निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे सर्वच महाराष्ट्राचे या पोट निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष लागलेले आहे. एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या भविष्याचा फैसला ६ नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालात होणार आहे.

राज्याचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागून असलेल्या या मतदार संघातील मतदानाचा वेग सकाळपासूनच मंद होता हे मतदानाच्या टक्केवारीवरून बघायला मिळते . या पोट निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत ९.२ टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत १६.८९ टक्के आणि दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झालं होतं. मतदानाची वेळ संपण्यासाठी काही वेळ शिल्लक असताना म्हणजे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के इतकेच मतदान झाल्याची आकडेवारी आहे. विशेष म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तरी देखील मतदारांनी मतदानात उत्साह दाखवलेला नाही असे या आकडेवारी वरून दिसते.

हे ही वाचा:

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी

 

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातून २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी अचानक निधन झाल्यामुळे त्याजागी ही पोट निवडणूक होत आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारी वरूनही अनेक अडचणी आल्या. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उभे राहीपर्यन्त अनेक घडामोडी घडल्या होत्या. भाजपने या जागेसाठी व्यापारी मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती आणि एकनाथ शिंदे गटानेही मुरजी पटेल यांना पाठिंबा जाहीर केला होता, परंतु भाजपने उमेदवारी दाखल केल्यानंतर ४ दिवसांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा असल्याची चर्चा होत आहे. मात्र मतदानाची कमी टक्केवारी बघता मतदारांच्या मनात कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे ६ नोव्हेंबरच्या निकालातच कळू शकणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा