पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय जनतेच्या मनावरील गारुड आजही कायम आहे. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असून भारतातील जनता आजही वेगवेगळ्या प्रकारांतून आपले पंतप्रधान मोदीं विषयीचे प्रेम दाखवत असते. पंतप्रधान मोदींच्या अशाच एका चाहत्याने अतिशय अनोख्या पद्धतीत आपले मोदी प्रेम दाखवून दिले आहे.
बिहार मधील एका शिल्पकाराने मोदींचे छोटेखानी पुतळे बनवले आहे. पण हे पुतळे साधेसुधे नसून त्याचा मुख्य उद्देश पैसे साठवणे हा आहे. त्याने मोदींच्या आकाराच्या पिगी बँक बनवल्या आहेत. बिहार मधील मुजफ्फरपुर जिल्ह्यातील जय प्रकाश या शिल्पकाराने ही करामत केली आहे. त्याचा असा दावा आहे की या पिगी बँकमध्ये एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम नोटा आणि नाणी या स्वरूपात साठवता येऊ शकते.
याबद्दल अधिक माहिती देताना जय प्रकाश सांगतो, “गेल्यावर्षी माझ्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे बनवण्याची कल्पना आली. कोविडच्या पहिल्या लाटेत जेव्हा मार्च महिन्यात मोदींनी जनता कर्फ्यू लावला तेव्हा ही कल्पना आपल्याला सुचली. देशातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. जगातील सर्वोत्तम पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत आणि त्याची लोकांमध्ये आणि खास करून लहान मुलांमध्ये चर्चा व्हावी असे आपल्याला वाटते.”
मोदी यांच्या आकाराची पिगी बँक बनवण्याची कल्पना त्यांच्याच विचारधारेतून आल्याचेही जय प्रकाश म्हणतो. कारण पंतप्रधान शक्य तिथे देशाचा पैसा वाचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ज्यामुळे देशाचा विकास होतो असे जय प्रकाशचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
लवकरच मोदी सरकारकडून एलआयसी आयपीओ बाबत निर्णय?
मोदींकडून वाराणसीत १५०० कोटींची विकासकामे
भारताच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण
सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष
जयप्रकाश ने बनवलेल्या या नरेंद्र मोदी पिगी बँकमध्ये त्याने ग्राहंकाचा विचार करत विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये मोदींच्या कुर्त्याचे आणि जॅकेटचे रंग निरनिराळे आहेत. या पिगीबँक वर खाली ‘बेस्ट पीएम इन द वर्ल्ड’ अर्थात ‘जगातील सर्वोत्तम प्रधानमंत्री’ असे लिहिले आहे.