…आणि बैल आंदोलनजीवींवर वैतागला!

…आणि बैल आंदोलनजीवींवर वैतागला!

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्याची नौटंकी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना मध्यंतरी चांगलीच महागात पडली होती. त्याचा दुसरा भाग बिहारमध्ये पाहायला मिळाला. फक्त यावेळी तिथे काँग्रेसऐवजी राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते होते.

या आंदोलनासाठी राजदचे कार्यकर्ते बैलगाडीवर बसले होते. पण तेवढ्यात त्या बैलाने हिसका दिला आणि तो निसटला. त्यामुळे बैलगाडीवर बसलेले कार्यकर्ते गाडीतच कोसळले. त्याच बैलाने नंतर माघारी फिरत याच आंदोलकांना शिंगावर घेतले. त्याला आवरता आवरता गाडीवानाच्या नाकीनऊ आले. हा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल झाला असून या आंदोलनजीवींच्या सोशल मीडियावर टोप्या उडविल्या जात आहेत. पेट्रोल डिझेलच्या या आंदोलनाच्या नौटंकीवरच तो बैल उखडला असणार, अशीही खिल्ली उडविली गेली.

हे ही वाचा:

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

… त्या लग्नासाठी उठला लॉकडाऊन?

…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा

मिराबाई चानूला मणिपूर सरकारकडून ही भेट…

याआधी, मुंबईत काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी असेच आंदोलन केले होते. बैलगाडीवर चढून घोषणाबाजी करत असताना वजनाने बैलगाडी मोडून पडली आणि सगळे कार्यकर्ते खाली कोसळले. त्यावरून त्या आंदोलनाची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्येही पाहायला मिळाली.
पेट्रोल डिझेलच्या भाववाढीविरोधात आंदोलनाची हौस पूर्ण करण्याचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळविण्याचे प्रयत्न तर केले जात आहेत. पण त्या नौटंकीवर आता लोक तोंडसुख घेऊ लागले आहेत.

Exit mobile version