काँग्रेसमध्ये आता आनंद शर्मा विरुद्ध अधीर रंजन चौधरी?

काँग्रेसमध्ये आता आनंद शर्मा विरुद्ध अधीर रंजन चौधरी?

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन आता काँग्रेसमध्येच मतमतांतरे निर्माण होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी या आघाडीवर प्रश्न उपस्थित करताना पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना प्रश्न विचारला आहे. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डावे पक्ष, काँग्रेस आणि आयएसएफने आघाडी केली आहे. मात्र, पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील आयएसएफ आणि काँग्रेसमध्ये फार काही सख्य नाही.

“आयएसएफ आणि अशा दुसऱ्या पक्षांशी आघाडी ही काँग्रेसच्या विचारधारांच्या विरोधात आहे. जो गांधी आणि नेहरु यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतावर आधारीत आहे. या मुद्द्यावर काँग्रेस कार्य समितीत चर्चा झाली पाहिजे.” असे ट्वीट आनंद शर्मा यांनी केले आहे. “जातीयवादाविरोधात लढाई लढताना काँग्रेस निवडक भूमिका घेऊ शकत नाही. या आघाडीला पाठिंबा देणं वेदनादायी आणि लज्जास्पद आहे. बंगाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं.” असेही आनंद शर्मा म्हणाले.

हे ही वाचा:

काय आहे जम्मूमधील ‘जी-२३’ बैठक?

अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे लोकसभेतील नेते असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. दरम्यान आनंद शर्मा हे काँग्रेसच्या बंडखोर ‘जी-२३’ मधले नेते आहेत.

Exit mobile version