शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे यांच्याविरोधात एका बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. केदार दिघे यांच्याविरोधात एन.एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.
केदार दिघे हे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. सध्या सुरू असलेल्या शिवसेनेतील फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
केदार दिघे आणि त्यांच्या मित्रावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….
आमदार संजय शिरसाट यांनी हटविला उद्धव ठाकरेंचा फोटो!
८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर
केदार दिघे यांचा मित्र रोहित कपूरने बलात्कार केल्याचा एका महिलेचा आरोप असून केदार दिघे यांनी तक्रार करू नये म्हणून धमकावल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. आय पी सी ३७६ – ५०६ / १ आणि ३४ याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केदार दिघे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्तामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अद्याप या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नसला तरी सध्याचे महाराष्ट्रातील ढवळून निघालेले राजकारण पाहता हे वृत्त खरे असल्यास आणखी वाद उत्पन्न होणार आहेत.