27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणगिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

देवेद्र फडणवीस यांचे प्रतिपादन व्हिडिओ सुद्धा शेअर

Google News Follow

Related

कसबा विधानसभा पोटनिवडणूकीच प्रचार आता शिगेला गेला आहे. भाजप मतदारसंघ राखण्यासाठी चांगलाच जोर लावत आहेत. तर काँग्रेसपक्षसुद्धा या मतदारसंघाचा जोरदार प्रचार करत आहेत. कसबा मतदारसंघात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकीट न दिल्याने टिळक यांच्या समर्थनार्थ नाराजी उमटली आहे. टिळक कुटुंबीयांनी सुद्धा हि नाराजी उघड केली होती. पण आज भाजपचे खासदार गिरीश बापट अत्यंत आजारी असून सुद्धा या प्रचारात उतरलेले दिसत आहेत.  उपमुख्यमंत्री  देवेद्र फडणवीस यांनी स्वतः आजारी असलेले गिरीश बापट हे नाकात नळ्या असून सुद्धा प्रचारासाठी आलेले बघायला मिळाले.

यामुळे गिरीश बापटांनी कसबा पोट निवडणुकीचा गड मजबूत केला आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. तसा त्यांनी बापट यांचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. गिरीश बापट यांनी व्हीलचेअरवर बसून एक छोटेखानी भाषण केले आणि मतदारांशी संवाद साधला. ज्यावेळेस बापटांचे भाषण सुरु होते तेव्हा , समोर उपस्थित असलेल्या महिला पदाधिकारी यांना आपले अश्रू अनावर झाले आणि त्या अश्रू पुसतच होत्या. बापट यांना या अवस्थेत बघून हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे हे खूपच अस्वथ झाले. त्यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बापट हे ऑक्सिजन लावून प्रचारासाठी आले त्यांना बघून मला गोव्याचे माजी मंत्री मनोहर पर्रीकर आठवले त्रास जरी बापट साहेबांना होत असला तरी त्याच्या वेदना आम्हाला जाणवत होत्या. त्यामुळेच आज व्यक्तिशः प्रचार आम्ही करणार नाही. आमच्या या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आहेच पण मी व्यक्तिशः प्रचार आज करणार नाही असेही दवे पुढे म्हणाले.  दरम्यान, हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी बापट हे नाकात ऑक्सिजनच्या नळ्या,हाताला ऑक्सिमीटर लावलेले होते. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असून सुद्धा ते प्रचारासाठी आले होते.

हे ही वाचा:

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव

सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी खाली ठेवल्या बंदुका

इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

बापट काय म्हणाले.
गिरीश बापट यांनी मतदारांशी संवाद साधताना म्हणाले कि, हि  निवडणूक चुरशीची नाही ,हि निवडणूक आपणच जिंकणार, कार्यकर्त्याच्या जीवावर आपण निवडणूक जिंकणार आहोत, कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे असेही बापट पुढे म्हणाले. बापट यांचे छोटेखानी भाषण चालू असताना महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर होत होते. हेमंतचे काम चांगले आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याने चांगले काम केलेले आहे. तुम्ही हेमंतला निवडून द्या. थोडी जास्त ताकद लावा निवडून आल्यावर मी पेढा घ्यायला येणार आहे , असेही बापट पुढे म्हणाले.

दरम्यान, भाजपने आजारी असतानाही गिरीश बापट यांना प्रचारांत उतरवले असल्याने त्यांच्यावर  टीका केली आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे परंतु ज्या वेळेस मुक्ता टिळक आजारी होत्या त्यावेळेस भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना मुंबईत आणले होते. आता कसबा पोटनिवडूक होत आहे आता सुद्धा गिरीश बापट आजारी असतानासुद्धा त्यांना प्रचारात उतरवल्याचे दिसत आहे. याबद्दल त्यांनी खेद  व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा