देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या हटके अंदाजासाठी कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्याची चर्चा असते तर कधी त्यांच्या ट्विट्सची. गुरूवारी अश्याच एका वेगळ्या प्रकारच्या ट्विटमुळे अमृता फडणवीस या चर्चेत आल्या. गुरूवारी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राज्याच्या जनतेला एक कोडं घातले आहे. हे कोडं त्यांनी हिंदीत घातले आहे. या अनोख्या पहेलीत अमृता फडणवीस असे म्हणतात.
“ओळखा कोण?
एक राजा जो, दरबारातून बाहेर पडत नाही, लोकांना भेटत नाही, सत्य आणि कर्माच्या रस्त्यावरून चालत नाही, वसूली शिवाय ज्याचे पानही हलत नाही, महामारी ज्याच्याकडून सांभाळली जात नाही, प्रगतीचे पुष्प त्याच्या सावलीत कधीच उमलत नाही.
सत्य आहे! धोका कधीच फळत नाही. अशा राजाला बघून तुमचं रक्त खवळत नाही?”
पहचान कौन?
एक राजा जो-
महल की चौखट से निकलता नही
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही !सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 8, 2021
हे ही वाचा:
अँटिलिया समोर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्यात मनसुख हिरेन यांचा हात
…तर खांडेकर संपादक पदाचा राजीनामा देणार का?
हर हर महादेव! अयोध्येनंतर आता काशी विश्वेश्वराला मुक्ततेची आस
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून एक सवाल राज्याच्या जनतेला केला आहे. या कोड्यातील राजा म्हणजे दुसरं – तिसरं कोणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांचे हे ट्विट म्हणजे त्यांनी नाव न घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला वार आहे. राज्यातील बिघडलेली कोरोना परिस्थिती, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर होणारे वसूलीचे गंभीर आरोप, अशा सगळ्याच मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.