विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप झाल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यातच अमृता फडणवीस यांनी आपल्या अनोख्या अंदाजात ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी काव्यात्मक पद्धतीने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा खळबळजनक दावा केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ह्याला वसुलीचे काम दिल्याचे या पत्रात म्हटले आहे. या पत्रानंतर ठाकरे सरकार पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
हे ही वाचा:
गृहमंत्र्यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांनांतर मुख्यमंत्री क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता
पोलिस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप करणे ही अभूतपूर्व घटना – देवेंद्र फडणवीस
दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ
मुख्यमंत्र्यांनी आता १०० कोटींच्या वसुलीचा खुलासा करावा
अशातच अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असून संधी मिळेल तेव्हा त्या ठाकरे सरकारला धारेवर धरता असतात.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021