अमृता फडणवीसांचा मुंबई महापालिकेला ‘थंब्स डाऊन’
आपल्या अनोख्या अंदाजासाठी कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. प्रति वर्षी पावसाळ्यात मुंबापुरीची तुंबापुरी करणाऱ्या महापालिकेच्या भोंगळ कारभारावर अमृता फडणवीस यांनी टीकास्त्र डागले आहे आणि तेही त्यांच्या नेहमीच्या हटके स्टाईलमध्ये!
शुक्रवार, १६ जुलै रोजी मुंबईत पुन्हा जोराच्या पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन ते तीन तासांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले. तर काही ठिकाणी या साचलेल्या पाण्यामुळे अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
हे ही वाचा:
शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब
मुंबईत पुन्हा महापालिकेचे काम ‘चव्हाट्यावर’
अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा
या तुंबलेल्या मुंबईमुळे महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामाच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेविरोधात टीकेची झोड उठली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील महापालिकेवर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अमृता यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील एका परिसरात हा फोटो काढला आहे. ज्यामध्ये पावसामुळे रस्त्यावर तुंबलेले पाणी दिसत आहे. तर या पाण्याचा इथे उभे राहून अमृता फडणवीस यांनी ‘थंब्स डाऊन’ दाखवत आहेत. या फोटो सोबत अमृता यांनी एक खास शायरी ही पोस्ट केली आहे.
“इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब!” असे लिहीत अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेना यांच्या कारभारावर दुहेरी तोफ डागली आहे.
इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब,
पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !#MumbaiRains #Monsoon2021 #Mumbai pic.twitter.com/zlrunfCwmR— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 16, 2021