“मलिक, ४८ तासात पत्रकार परिषद घेऊन माफी मागा अन्यथा…”

“मलिक, ४८ तासात पत्रकार परिषद घेऊन माफी मागा अन्यथा…”

अमृता फडणवीसांची कायदेशीर नोटीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे लपसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मलिक यांनी आपली बदनामी करणारे ट्विट्स केल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी हे ट्विट्स डिलीट करत आपली ४८ तासांमध्ये बिनशर्त माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.

गुरुवार, ११ नोव्हेंबर रोजी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. ड्रग्स पेडलर म्हणून अटकेत असलेल्या जयदीप राणा यांच्यासोबतचा अमृता यांचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केला होता.

यावेळी भाजपाच्या ड्रग कनेक्शन विषयी चर्चा करूया असे मलिक यांनी म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले असून एका कार्यक्रमात जयदीप राणा हा भेटला असून त्या वेळी हा फोटो काढण्यात आल्याचे सांगितले. नवाब मलिक यांची ही ट्विटस आपली बदनामी करणारी असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट

इंग्लंडला धूळ चारत न्यूझीलंड अंतिम फेरीत

दोन वर्ष MPSC परीक्षा नाही, पण मुदतवाढ मात्र वर्षभराचीच

तेव्हा नवाब मलिक यांनी ही ट्विट्स तात्काळ डिलीट करून पुढच्या ४८ तासांत पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे. तसे न झाल्यास नवाब मलिक यांच्या विरोधात फौजदादरी आणि दिवाणी स्वरूपाचा खटला दाखल करणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान नवाब मलिक यांची कन्या निलोफर हिने देखील देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

 

Exit mobile version