अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणावरून सरकारवर चौफेर टिका केली जात आहे. यात आता अमृता फडणविस यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी नागपूरातील कोरोनाच्या परिस्थितीवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्या पत्नी अमृता फडणविस यांनी सरकारला लक्ष्य करत ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘जेव्हा एकीकडे नागपूर सारख्या शहरांत कोरोना रुग्णांना दाखल करायला रुग्णालयांत जागा नाही तिथे दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे आणि काही उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याच्या योजना आपल्याच काही पिट्ट्यांकडून करत आहे.’
जहां एक तरफ #Nagpur जैसे शहरो में #Corona मरीज़ों को भरती करने की भी अस्पतालों मे जगह नही है,वहाँ दूसरी तरफ #Maharashtra सरकार #covid centres में भ्रष्टाचार कर रही है और उद्योगपातियों को डराके उनसे वसूली करने की योजनाए अपने ही कुछ पिट्ठुओं के साथ मिलकर बना रही है #SachinWaze 👎
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 17, 2021
अमृता फडणविस या सोशल मिडियावर कायम चर्चेत असतात. ८ मार्च रोजी त्यांनी एका व्हिडिओद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त संदेश देखील प्रसारित केला होता. त्यांनी विविध सामाजिक विषयांना अनुसरून वेळोवेळी आपले विचार देखील मांडले आहेत.
हे ही वाचा:
राजन यांच्या बुद्धीचा मोदी द्वेषाने ताबा घेतलाय- अतुल भातखळकर
बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात
मुंबईत कोविडचे थैमान सुरु असताना आदित्य ठाकरे सुट्टीवर?
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे आणि सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचे केंद्र सरकारकडून सांगितले गेले आहे. ठाकरे सरकार मात्र उद्योगपतींकडून पैसे वसूल करण्यच्या योजना करण्यांत गुंतले असल्याची टिका त्यांनी केली आहे.