मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, १४ मे रोजी घेतलेल्या मुंबईतील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, १५ मे रोजी घेतलेल्या सभेत यावर प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी सोमवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया,” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. अमृता फडणवीस या काही राजकीय विषयांवर आपलं मत बेधडकपणे व्यक्त करत असतात.
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया … 🙃#Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022
“बाबरी पडली तेव्हा मी अयोध्येत होतो. पण तेव्हा देवेंद्र फडणवीस बाबरी मशिदीवर चढले जरी असले तर त्यांच्या वजनाने बाबरी खाली कोसळली असती,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.
हे ही वाचा:
दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र
होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!
नितेश राणेंचा मुंबई पालिका आणि ठाकरे सरकारवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणातून प्रत्युत्तर दिले होते. “आज माझं वजन १०२ किलो आहे, बाबरी पाडायला गेलो होतो त्यावेळी माझं वजन १२८ किलो होतं, लाजायचं काय त्यात? मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही, त्यांना एफएसआयच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल तर आज माझा २ आहे आणि बाबरी पाडताना तो २.५ होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.