दोन दिवसांपासून संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू होती. ती पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजप विरुद्ध मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. साडेतीन नेत्यांना कोठडीत पाठवणार असल्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र, अखेर पर्यत संजय राऊत यांनी त्या नेत्यांची नावे घेतलीच नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांची पत्रकार परिषद होताच भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद फुसकी असल्याचे म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है’ म्हणजेच त्यांनी संजय राऊत यांना मांजरीची उपमा देत टोला लगावला आहे.
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 15, 2022
हे ही वाचा:
‘आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है’
‘गौप्यस्फोटापेक्षा आपटी बार बरा असतो’
संजय राऊत यांची ‘साडेतीन’ फिल्म ठरली फ्लॉप!
चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी!
त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी बोलताना म्हटले की, त्यांना योग्य वेळी उत्तर देण्यात येईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन दिवस इतका आवाज करूनही ही पत्रकार फुसका बार ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेले आरोप गळ्याशी येताच त्यांनी शिवसेना वापरली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. विधान परिषेद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही हा तर अगदीच फुसका बार असल्याचा टोला लगावला. आपटी बार पण बरा असतो अशीही टीका त्यांनी केली आहे.