26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण'ए भाई, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय'; अमृता फडणवीसांनी झापले

‘ए भाई, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’; अमृता फडणवीसांनी झापले

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवरून भाई जगताप यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. भाई जगताप यांनी एका थेट अमृता फडणवीस यांचावर टीका करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावर अत्यंत तिखट प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी दिले आहे.

एबीपी माझाच्या ट्वीटरवर भाई जगताप यांची एक बातमी झळकली होती. यात त्यांनी राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे म्हटले होते.

हे ही वाचा:

हॉस्पिटलनेच उघडे पाडले देशमुख-पवारांचे पितळ

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी

रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह

यावर अमृता फडणवीस यांनी कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये,‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’ असे म्हटले आहे.’

ही खाती वास्तविक आघाडी सरकारच्या काळातच ॲक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. याबाबत फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधकांना वेळोवेळी उघडे पाडले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा