हनुमान चालिसावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. याच मुद्यावरून उद्धव ठाकरे सरकारलाही त्यांनी चांगलंच कोंडीत पकडलं होतं. शिवसेनेविरोधात सतत वक्तव्य केल्यानेही नवनीत राणा चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र आल्यानं अमरावतीत खळबळ माजली आहे. राणा यांच्या हितचिंतकाने त्यांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रातून त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काही संशयास्पद लोक राजस्थानच्या सीमेवरून अमरावतीत आले आहेत. ते तुमच्या घरीदेखील येऊन गेले, त्यामुळे मी अल्लाहकडे तुमच्या सुखरुपतेची प्रार्थना करतो. काही लोकांची तुमच्यावर नजर आहे. सावध रहा. तुम्हाला काहीही होऊ नये, असं वक्तव्य या पत्रातून करण्यात आलं आहे. राणा यांना हे निनावी पत्र आले आहे.
हे ही वाचा:
पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
कितीही धमक्या आल्या तरी लढणार
कोल्हे हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने त्यांना हे धमकीचं पत्र आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र कितीही धमक्या आल्या तरी आपण घाबरणार नाही, लढत राहणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वीही आलेली धमकी
दरम्यान दोन महिन्यांपूर्वीही खासदार नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती. एका मुस्लिम धर्मगुरूने फोन कॉलवरुन हनुमान चालीसा पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी दिली होती. तसेच, काही वर्षांपूर्वी एका अज्ञाताने नवनीत राणा यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर गेल्या वेळी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर धमकीचे पत्र असल्यामुळे राजकीय वर्तुळातही या चर्चांना उधाण आले होते. मात्र या धमकीच्या पत्रात कोणत्याही नेत्याचे नाव मात्र नव्हते.