खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट

व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला

खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट

रविवार, २ जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यानिओ शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतेली. तसेच अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे देखील शपथविधी सोहळ्याच्यावेळी राजभवनात उपस्थित होते. मात्र, त्यानंतर सोमवार, ३ जुलै रोजी ट्वीट करत अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अमोल कोल्हे यांनी यु- टर्न घेत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी काल अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज अमोल कोल्हे यांनी मी शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी यासंबधी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका जाहीर करत म्हटलं की, “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। मी_साहेबांसोबत,” असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?

‘कोणतीही अनियमितता नाही; पालिकेच्या मुदतठेवी वाढत आहेत’

पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडाला?

इसिसशी संपर्क असल्याच्या संशयावरून एनआयएची मुंबई, पुण्यात छापेमारी

राज्याच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली आणि जवळपास ४० आमदारांसह अजित पवार यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली.

Exit mobile version