पेगॅसस हेरगिरी प्रकरणात ॲमनेस्टीचा घुमजाव

पेगॅसस हेरगिरी प्रकरणात ॲमनेस्टीचा घुमजाव

पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करून भारतीयांवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे. ॲमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने याप्रकरणी घूम जाओ केले आहे. लिक झालेला नंबर्सचा डेटा हा एनएसओ कंपनीच्या पेगॅसस स्पायवेअरशी संबंधित होता असा दावा आपण कधी केलाच नसल्याचे ॲमनेस्टी इंटरनॅशनल संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

किम झेटर नावाच्या सायबर सुरक्षा पत्रकाराने यासंबंधीचे ट्विट करून खुलासा केला आहे. ॲमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या नव्या दाव्यानुसार लिक झालेले नंबर हे अशा स्वरूपाचे आहेत ज्यात कंपनीच्या ग्राहकांना रस असू शकतो. हे असे नंबर आहेत जे ‘नंबर्स ऑफ इंटरेस्ट’ म्हणून मार्क केले गेले. म्हणजेच त्यांच्यात रस असण्याची शक्यता वर्तवली गेली. पण याचा अर्थ असा होत नाही की या क्रमांकावर एनएसओ कंपनीच्या पेगॅसस स्पायवेअर मार्फत पाळत ठेवली गेली.

हे ही वाचा:

कोकणच्या मदतीला दिल्ली तत्पर

चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार

चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित

ऑलिंपिकच्या उद्घाटनाची प्रतीक्षा… भारतीय खेळाडू सज्ज!

हे नंबर्स अशा व्यक्तींचे आहेत ज्यांच्यावर एनएसओच्या ग्राहकांना पाळत ठेवाविशी वाटू शकते किंवा त्यांच्यावर पाळत ठेवली जाऊ शकते असे ॲमनेस्टी इंटरनॅशनलच्या दाव्यातून स्पष्ट झाले आहे. पण याचा अर्थ त्यांच्यावर हेरगिरी केली गेली असा होत नाही असे देखील ॲमनेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे. त्यामुळे आता हेरगिरी प्रकरणाला नवीन वळण प्राप्त झाले आहे. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या विरोधकांच्या कांगाव्या मधली पुरी हवाच निघून गेली आहे.

Exit mobile version