‘पर्यावरण मंत्र्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही’

‘पर्यावरण मंत्र्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही’

महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील ४० हून अधिक किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी आजपासून त्यांच्या या मोहिमेला सुरुवात केली. दरम्यान माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी समुद्र किनारे अस्वच्छ असण्याला यंत्रणा जबाबदार असल्याचे म्हणत सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

लोकांना त्यांच्या हक्काचा समुद्र किनारा मिळायला हवा, म्हणून हा पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडे यंत्रणा आहे, गेली २५ वर्षे यांच्याकडे यंत्रणा आहे तर यांना समुद्र किनारे स्वच्छ करता आले नाहीत का? असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी यंत्रणा वापरून हे काम केले असते तर आज ही वेळ आली नसती असे अमित ठाकरे म्हणाले. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण मंत्र्यांची आणि एकूणच सत्तेत असणाऱ्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काही काम करण्याची इच्छा दिसून येत नाही, असा टोला अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सत्ताधारी शिवसेनेला लगावला आहे. नागरिकांनीच आता आपल्या हाती ही मोहीम घ्यायला हवी असे आवाहनही अमित ठाकरे यांनी केले आहे.

हे ही वाचा:

बाळकृष्ण दोशी यांना रॉयल गोल्ड मेडल

बिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?

‘एसटी संप चिघळवून जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव दिसतोय’

काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे यांनी राज्यातील जनतेला साद घालत राज्यभरातील समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे सांगितले होते. यासाठी जास्तीत जास्त जनतेने पुढे यावे, असे आवाहन अमित ठाकरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केले होते. त्यानुसार मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये हे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात येत आहेत.

Exit mobile version