भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज प्रत्यक्ष लाल किल्ल्याला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. शाह लाल किल्ल्याच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्याबरोबरच ते जखमी पोलिसांची देखील भेट घेणार आहेत.
मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रॅक्टर रॅली काढण्याची मागणी गेले दोन महिने आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी केली होती. या रॅलीसाठी पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर ठराविक मार्गावरून काढण्याबाबत एकमत झाले होते. मात्र प्रत्यक्ष त्यादिवशी आंदोलकांनी ठराविक मार्ग सोडून मध्य दिल्लीकडे जाण्याची मागणी केली. पोलिसांनी त्याला विरोध केल्यानंतर मोठा हिंसाचार उफाळून आला. दंगेखोर लाल किल्ल्याच्या दिशेने गेले. तिथे तोडफोड करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या हिंसाचारात तीनशेपेक्षा अधिक पोलिस जखमी झाले आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या दंगेखोरांना तंबी दिली आहे. सर्वच दंगेखोरांविरूद्ध सरकार कडक कारवाई करणार असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं आहे. कालपासूनच पोलिसांनी आपल्या कारवाईला सुरूवात करत, वीसपेक्षा जास्त एफआयआर दाखल केल्या आहेत. यात अनेक नेत्यांची नावे देखील सामिल आहेत. अमित शहा आज दुपारी १२ वाजता लाल किल्ल्याला भेट परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्याबरोबरच ते जखमी पोलिसांची देखील भेट घेणार आहेत.