गुजरातमध्ये चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी अहमदाबाद येथील नगरपालिकेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदान केले.
हे ही वाचा:
सध्या गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. भाजपा गेली अनेक वर्षे सातत्याने या सर्व ठिकाणी आपली सत्ता राखण्यात यशस्वी झाला आहे.
अमित शहा हे अहमदाबाद येथील नारणपुरा मतदार संघातील नोंदणीकृत मतदाते आहेत. त्यांनी आपल्या परिवारासमवेत मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर त्यांनी आपल्या परिवारासमवेत जवळच्याच कामनाथ महादेव मंदिरात प्रार्थना केली. त्याचा फोटो अमित शहांनी ट्वीटरवरून शेअर केला आहे.
आज अहमदाबाद के नारणपुरा में गुजरात स्थानीय निकाय चुनावों में अपना मतदान किया।
प्रदेश के 6 नगर निगमों में आज मतदान हो रहा है, मैं वहाँ के सभी मतदाताओं को अधिक से अधिक संख्या में मतदान करने की अपील करता हूँ। pic.twitter.com/r0XxjUksqh
— Amit Shah (@AmitShah) February 21, 2021
पत्रकारांशी त्यानंतर अमित शहा यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा पुन्हा एकदा या ठिकाणी विजयी होईल याबाबत विश्वास व्यक्त केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा एक विजेता पक्ष म्हणून समोर आला आहे. मला खात्री आहे गुजरातमध्ये जिथून भाजपाच्या विजयाला प्रारंभ झाला, भाजपा आपली पकड पुन्हा एकदा बसवेल.”
शाह असे देखील म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने देशभरात विकासाला प्रारंभ केला असून अनेक राज्यांनी प्रेरणा घेतली आहे. मला खात्री आहे, की लोक मोठ्या प्रमाणात मतदान करायला येतील आणि विकासाचा पुन्हा एकदा विजय होईल.