‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’

गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा नेत्यांशी साधला संवाद

‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण कोणताही शब्द दिला नव्हता. पण त्यांनी आम्हाला धोका दिला. धोका देणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी भाजपाचे पदाधिकारी, नेते यांच्याशी बैठकीत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सर्वांना संबोधित केले.

अमित शहा म्हणाले की, शिवसेना खयाली पुलाव बनवत आहे. त्यांच्या कृतीमुळेच त्यांचा पक्ष छोटा राहिला. भाजपाचा त्यात दोष नाही. २०१९निकालानंतर कोणताही शब्द दिलेला नव्हता. मला फडणवीसांचा फोन आला होता की, असा कोणता शब्द मुख्यमंत्रीपदाबाबत दिला आहे का, तेव्हा असा कोणताही शब्द देण्यात आलेला नसल्याचे आपण फडणवीसांना सांगितले.

हे ही वाचा:

‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

५० फुटावरून झुला खाली आदळला आणि

Cyrus Mistry Death : सीट बेल्ट न लावल्यामुळे सायरस मिस्त्रींचा घात झाला

 

मेघदूत बंगल्यावर अमित शहा आणि भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी अमित शहा यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना स्वतःच्या निर्णयामुळे छोटी झाली. मुंबई महानगरपालिकेसाठी अमित शहा यांनी १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचीही चर्चा रंगली आहे. संध्याकाळी भाजपाचे नगरसेवक, राज्यातील आघाडीच्या नेत्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

त्याआधी अमित शहा यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या घरी जाऊन तिथेही गणपतीचे दर्शन त्यांनी घेतले.

अमित शहा यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे

Exit mobile version