भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की, ज्यात काम करणारा एक बूथ कार्यकर्ताही राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतो. या पक्षात जो मागतो त्याला काही मिळत नाही, पण तो न मागता निस्वार्थपणे काम करतो, त्याला सगळे मिळते, अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजपामधील कार्यकर्त्यांचे महत्त्व विषद केले.
जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणेने भाषणाची सुरुवात केल्यानंतर अमित शहा म्हणाले की, मी पण एक बूथ कार्यकर्ता म्हणूनच सुरुवात केली. तिथून माझ्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. १६५० राजकीय पक्ष भारतात आहेत पण या राजकीय पक्षांत बूथचा अध्यक्षही राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतो. माझ्या परिवाराची राजकीय पार्श्वभूमी नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण मला या महान पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष बनविले. अनेक ठिकाणी मी सतरंज्या अंथरल्या, भिंती रंगविल्या. पण जो इथे मागतो त्याला कधी मिळत नाही. पण जो मागत नाही त्याला पार्टी देते.
हे ही वाचा:
‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’
गोवा मुक्ती दिनावर बाळासाहेबांनी काढलेले हे भन्नाट व्यंगचित्र
केरळमध्ये पुन्हा फोफावला राजकीय हिंसाचार! १२ तासात २ हत्या
महाविकास आघाडीचं सरकार दारू विकणाऱ्यांचं, दारू पिणाऱ्यांचं!
अमित शहा म्हणाले की, जनसंघच्या रूपात या पक्षाची स्थापना झाली १९५० मध्ये. त्यावेळी कशी स्थिती होती? स्वातंत्र्य नुकतेच मिळाले होते. स्वातंत्र्याचे यश काँग्रेसला दिले जात होते. काही वाद तेव्हा उत्पन्न झाले. काँग्रेसचे सिद्धांत पसंत नाहीत, असाही एक वर्ग तेव्हा होता. त्यांनी एक पार्टी बनविण्याचे ठरविले. त्यांनी जनसंघाची स्थापना केली. आज पाहा काय काळ आला आहे. ७० वर्षांत विश्वातील सर्वात मोठा पक्ष भाजपा बनला आहे. तेव्हा आम्हाला म्हटले जात होते, ‘हम दो हमारे दो’ पण तेच आज ४४ वर अडकलेत. हा पक्ष कधीही नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे.