24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणशरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षण गायब होते... ते तर भ्रष्टाचाराचे...

शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षण गायब होते… ते तर भ्रष्टाचाराचे सरदार

गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल

Google News Follow

Related

‘जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते. पण शरद पवार यांचे सरकार आले की मराठा आरक्षण गायब होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं, मात्र शरद पवार सत्तेत आल्यावर ते आरक्षण गायब झालं. भ्रष्टाचारांचा सर्वात मोठा सरदार म्हणजे शरद पवार असल्याचं म्हणत अमित शाह यांनी टीका केली.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या भाजपाच्या अधिवेशनात अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या आणि इंडी आघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

 

अमित शाह यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते आहेत असे अमित शहा म्हणाले. “नरेंद्र मोदी यांनी तुष्टीकरणाच्या ऐवजी सर्वांना न्याय देण्याचं काम करत देशाच्या संरक्षणाला सुनिश्चित केलं आहे. आतंकवादला मुळासकट फेकून टाकण्यासाठी निर्णय घेतले आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. देशाच्या सुरक्षेला औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करु शकत नाही. भाजप करु शकते. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? आघाडीवाले आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, श्रीमान उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेता बनले.  “स्वत:ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. उद्धवजी याकूब सोडवण्याची मागणी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात. झाकीर नाईकच्या समर्थकांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हा औरंजेब फॅनक्लब महाराष्ट्र आणि देशाला सुरक्षा देऊ शकतो का?”, असा सवालही त्यांनी विचारला.

अमित शहा यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की,  बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितका काँग्रेसने केला आहे तितका इंग्रजांनी सुद्धा केला नव्हता. बाबासाहेबांशी जोडलेले पाच तीर्थ बनवण्याचं काम भाजपने केले.  बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार काँग्रेस पक्ष असताना मिळाला नाही. नरेंद्र मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या आठवणीत दिल्लीतही त्यांचं भव्य स्मारक बनवण्याचं काम सुरु आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशातील ५६ टक्के आरक्षण रद्द, ९३ टक्के जागा गुणवत्तेवर भरणार !

अफगाणींचा पाकिस्तानी दूतावासावर हल्ला, पाकचा ध्वज उतरवला !

जरांगेंचा भंपकपणा उघड करून त्यांच्यावरच भूत नक्कीच उतरवू !

विकास प्रकल्प रद्द करणे हीच उद्धव ठाकरेंची खासियत !

“भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेला सुनिश्चित केलं आहे. देशात दशकांपासून असलेल्या नक्षलवादाच्या त्रासाला आता समाप्तीच्या मार्गावर आणला आहे. मी आज आपल्याला सांगू इच्छितो की, पुढच्या दोन वर्षात हा देश नक्षलवाद्यांपासून मुक्त होणार आहे.

 

राहुल गांधींना हरल्यावरही अहंकार

 

अमित शहा म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हरल्यावरही अहंकार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात येत्या निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आपण सत्ता मिळवण्याच्या हेतूने काम करणारे लोक नाही आहोत. विचारधारेला घेऊनच भाजप पार्टीची स्थापना केली आहे. देशात आणखी १५ वर्षे भाजपचे सरकार राहणार असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस देशात चुकीचा प्रचार करत आहेत. गेल्या १० वर्षा आम्ही गरिबांचं कल्याण करण्याचं काम केलं आहे. काँग्रेस कधीही गरिबांचं कल्याण करू शकत नाही. भाजप संविधान संपवणार असल्याचा चुकीचा विचार केला. महाराष्ट्र आणि हरियाणा जिंकल्यावर राहुल गांधी यांचा अहंकार मोडेल, असेही शहा म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा