महायुतीची सत्ता आल्यावर बांगलादेशी, रोहिंग्या याना हद्दपार करू!

अमित शहा यांचे बोरीवलीत आश्वासन

महायुतीची सत्ता आल्यावर बांगलादेशी, रोहिंग्या याना हद्दपार करू!

महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे. मविआला सत्तेची हाव आहे. महाराष्ट्रात जनता महाविकास आघाडीचा सुपडा साफ करणार आहेत. भाजपच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार बनल्यावर बांगलादेशी आणि रोहींग्याना बाहेर हाकलून दिले जाईल, असा घणाघात गृहमंत्री अमित शहा यांनी बोरीवलीत केला. येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमित शहा मुंबईत आले होते. अतुल भातखळकर, संजय उपाध्याय, विनोद शेलार, प्रकाश सुर्वे, योगेश सागर, मनीषा चौधरी हे महायुतीचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन अमित शहा यांनी केले. खासदार पियुष गोयल, आशिष शेलार हेदेखील यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

भाजपा-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे!

महाराष्ट्रात १९९५ नंतर हे प्रथमच घडते आहे…

बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?

रशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!

अमित शहा म्हणाले की, उत्तर मुंबईतील ६ उमेदवारांना विजयी करायचे आहे. २३ नोव्हेंबरला महायुतीचे सरकार बनणार आहे. नरेंद्र मोदी यांनी दिलेले वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक येथे काँग्रेसने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आम्ही दिलेली सर्व वचने पूर्ण केली. आम्ही ३७० कलम हटवले आणि भारताला एकत्र ठेवण्याचे काम केले.

अमित शहा यांनी सीएए कायद्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, आम्ही २०१९ ला हा कायदा केला. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्य हिंदू,बौद्ध, पारशी, ख्रिश्चन याना भारताचे नागरिकत्व मिळणे शक्य झाले.

अमित शहा यांनी राहुल गांधी आणि शरद पवारांवर हल्ला केला. यांच्याकडून महाराष्ट्राचा विकास होणार नाही. याच मविआने लाडकी बहीण योजनेचा विरोध केला. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Exit mobile version