इंडियन एक्स्प्रेसच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना अमित शहा यांनी पत्रकारांना सल्ला दिला. ते म्हणाले की, शासन कुणाचेही असो, त्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत.
सरकारची विचारधारा कोणतीही असो पण आलेल्या निकालांचा स्वीकार खुल्या मनाने केला गेला पाहिजे. नाहीतर तुम्ही पत्रकारांचे काम करत नाही तर ते एका चळवळ्याचे काम करत आहात. पत्रकार हा चळवळ करणारा असू शकत नाही आणि चळवळ करणारा पत्रकार असू शकत नाही. दोन्ही कामे, धर्म वेगवेगळे आहेत. दोन्ही आपापल्या ठिकाणी उत्तम आहेत पण ते एकमेकांची कामे करून लागले तर गडबड होणार. आजकाल हे होताना दिसते आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द
सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियातून काँग्रेसचा ‘हात’ हटवला
हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित
अमित शहा म्हणाले की, सुविधांचा विचार करता सगळ्यांनी व्यापक दृष्टिकोनातून विकासाकडे पाहिले पाहिजे. जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे पाहतो तसा विकास आयुक्त त्यात दृष्टीकोनातून त्या गोष्टीकडे पाहात नाहीत. अर्थात, विकास आयुक्त हेदेखील असेच कधीतरी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले असते. म्हणून अधिकाऱ्यांनी बर्ड आय व्ह्यू पद्धतीने कामांकडे पाहायला हवे.
अमित शहा म्हणाले की, प्रशासनिक सुधारणांसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. ई गव्हर्नन्सची अंमलबजावणई सुरू केली आहे. पहिल्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांची पद्धती नियमांवर आधारित होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही पद्धती तुमची भूमिका काय असेल याआधारावर करण्यात आली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एक परिवर्तन आले. प्रथम धोरणे मतांचा विचार करून होत होती. सरकार निवडून यावे या उद्देशाने धोरणे तयार होत होती, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर धोरणे लोकांना छानवाटतील अशी करण्यात आली नाहीत. लोकांसाठी ती धोरणे लाभदायक आहेत की नाही यादृष्टीने ती आखली गेली.