महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी धुळे येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी गांधी परिवारावर निशाणा साधत म्हटले की, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी तुम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ शकणार नाहीत. कलम ३७० च्या मागणीवरूनही अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
अमित शाह म्हणाले की, उमेला गटाच्या लोकांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि मुस्लिमांना आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी केली. मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणात कपात करावी लागेल. अहो राहुल गांधी, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण काढून तुम्ही मुस्लिमांना देऊ शकत नाही,” अशी टीका अमित शाह यांनी केली. काँग्रेस ओबीसींचा विरोध करणारा पक्ष असल्याचेही ते म्हणाले.
“काँग्रेसने ७० वर्ष राम मंदिराचं काम होऊ दिलं नाही. राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केलं. शरद पवार, सुप्रिया सुळे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणीही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आलं नाही. कारण त्यांना विशिष्ट वोट बँक हातातून जाईल याची भीती होती. महाविकास आघाडीने लाडकी बहिण योजनेलाही विरोध केला. त्यांना ती योजना बंद करायची आहे,” अशी टीका त्यांनी केली. पुन्हा ३७० कलम लावण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसबद्दल अमित शाह म्हणाले की, इंदिरा गांधी स्वतः स्वर्गातून आल्या तरी हे कलम पुन्हा लागू होणार नाही.
हे ही वाचा :
ट्रम्प टीममधील भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी आहेत कोण?
पूर्व लडाखमधील भारत- चीन सीमेवर गस्त घालण्याची एक फेरी पूर्ण
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
दिल्लीच्या हवेत सुधारणा नाहीच; उत्तर प्रदेशसह पंजाब, आसाममध्येही दाट धुके
उद्धव ठाकरे सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांची तत्वे विसरले आहेत. उद्धव ठाकरे त्या लोकांसोबत बसलेत ज्यांनी औरंगाबादचे नाव छ. संभाजी नगर ठेवण्यास विरोध केला, राम मंदिर उभारणीला विरोध केला, ३७० कलम हटवण्यास विरोध केला, सर्जिकल स्ट्राईकला विरोध केला आणि जे हिंदूंना दहशतवादी म्हणतात, अशी बोचरी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केली.