“दिल्लीकरांच्या पैशांनी बांधलेल्या शीशमहालाचा हिशोब केजरीवालांनी द्यावा”

गृहमंत्री अमित शाह यांचा निशाणा

“दिल्लीकरांच्या पैशांनी बांधलेल्या शीशमहालाचा हिशोब केजरीवालांनी द्यावा”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी शनिवारी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या पैशाचा वापर करून शीशमहाल बांधला आणि त्यांनी दिल्लीतील लोकांना याची माहिती देण्याची गरज आहे.

“काही मुले मला माझ्या घरी भेटायला आली होती. मी त्यांना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीसाठी काय केले, असे विचारले. एका मुलाने सांगितले की, त्यांनी स्वतःसाठी एक मोठा शीशमहाल बांधला. जेव्हा अरविंद केजरीवाल राजकारणात आले, तेव्हा ते सांगायचे की, मी सरकारी गाडी किंवा सरकारी बंगला घेणार नाही पण, आज त्यांनी दिल्लीकरांचा पैसा वापरून शीशमहाल बांधला, त्याचा हिशोब तुम्हाला दिल्लीतील जनतेला द्यावा लागेल,” अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळाचे स्मरण केले. “पक्षाच्या महान नेत्यांपैकी एक म्हणून सुषमा स्वराज नेहमी लक्षात ठेवल्या जातील. भारताच्या राजकीय इतिहासात, केवळ मंत्री म्हणून लक्षात न राहता त्या विरोधी पक्षनेत्या म्हणूनही लक्षात राहतील. त्यांनी काँग्रेसचा भ्रष्टाचार संसदेत उघडकीस आणला. मी अपेक्षा करतो की सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा आणि त्यांनी जे कार्य केले ते पाळण्याचा प्रयत्न करावा,” असं अमित शाह म्हणाले.

हे ही वाचा..

“गावे स्वावलंबी असतील तेव्हाच देश स्वावलंबी होईल”

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिव्हन अजित डोवाल यांना भेटणार

दिल्लीत भाजपची पहिली यादी जाहीर

बायडन यांच्या पत्नीला पंतप्रधान मोदींकडून मिळालेला हिरा ठरला सर्वात महागडी भेट

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर काचेच्या महालावरून निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींनी आप सरकारला आपत्ती सरकार म्हणत म्हटले की, मीही काचेचा महाल बांधू शकलो असतो. पण मी स्वतःचे घर कधीच बांधले नाही, १० वर्षात ४ कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिली.

Exit mobile version