अमित शहा म्हणाले, विरोधक चर्चा करण्यापेक्षा मिमिक्रीत मग्न होते!

संसदेत कायदे मंजूर केल्यानंतर व्यक्त केली प्रतिक्रिया

अमित शहा म्हणाले, विरोधक चर्चा करण्यापेक्षा मिमिक्रीत मग्न होते!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी तीन फौजदारी न्याय कायद्यांवरील संसदीय चर्चेवर ‘बहिष्कार’ टाकल्याबद्दल विरोधी पक्षांची निंदा केली. ‘या प्रमुख कायद्यांवर चर्चा करण्याऐवजी ते घटनात्मक पदावरील व्यक्तीची नक्कल करण्यात व्यग्र होते,’ अशी टीका शाह यांनी केली. चंदिगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीसीईटी) येथे आयोजित उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.

‘एक आमदार म्हणून मी हे विधेयक संसदेत मांडत होतो. विरोधकांनी विधेयकांवर आपली मते आणि सूचना मांडाव्यात, अशी माझी इच्छा होती. परंतु दुर्दैवाने त्यांनी चर्चेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला,’ असे शहा म्हणाले. ‘केंद्राने तीन फौजदारी न्याय विधेयके तयार करताना, पोलिस, वकील, कायदेतज्ज्ञ आणि कायद्यावरील पुस्तकांचे व्यवहार करणाऱ्या प्रकाशन संस्थांसह विविध गटांची मते आणि सूचना घेतल्या.

हे ही वाचा:

हार्दिक अनफिट; मुंबई इंडियन्सला धक्का

मराठा समाजाला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली

कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना  

राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत फलक आणण्यास प्रवृत्त केले

 

गृह प्रकरणावरील स्थायी समितीमध्येही या विधेयकांवर चर्चा करण्यात आली, ज्यात मोठे बदल सुचवण्यात आले होते,’ असे शहा म्हणाले. “परंतु जेव्हा देशाच्या फौजदारी न्याय व्यवस्थेतील मोठ्या बदलांवर संसदेत चर्चा होत होती, तेव्हा विरोधी पक्ष सदस्य उपराष्ट्रपतींची नक्कल करण्यात व्यग्र होते. यापेक्षा निंदनीय कृती असूच शकत नाही,’ असे शहा म्हणाले.

तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या निषेधादरम्यान संसदेच्या पायऱ्यांवर उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. केंद्रीय गृहमंत्री त्यावेळी संसदेबाहेर सुरू असलेल्या घडामोडींचा संदर्भ देत होते. या नक्कलीचे चित्रिकरण करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरही शहा यांनी टीका केली. म्हणाले, “काँग्रेससारख्या जुन्या पक्षाचा एक प्रमुख नेता याचा व्हिडिओ बनवत होता. अनेक सरकारे आली आणि गेली, परंतु सर्व घटनात्मक पदांची प्रतिष्ठा कायम राखली गेली आहे,’ याकडे शाह यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version