केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकांशी संवाद साधला. तीन दिवसांच्या भेटीमध्ये दुसऱ्या दिवशी शहा यांनी केंद्रशासित प्रदेशाची हिवाळी राजधानी जम्मूला भेट दिली. यासोबत त्यांनी आरएस पुरा सेक्टरमधील भारत-पाकिस्तान सीमेलाही भेट दिली. जम्मूजवळील मकवाल येथे बीएसएफच्या चौकीला भेट देताना त्यांनी लष्कराच्या जवानांशी चर्चा केली, तर शाह यांनी स्थानिक लोकांशी त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. स्थानिकांना बोलते करण्याचे हे क्षण अगदी भारावून टाकणारे होते. त्यांनी खूप मनमोकळेपणाने स्थानिकांशी संवाद साधला.
शहा यांनी मकवाल येथील एका स्थानिक रहिवाशाचा फोन नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केला. एवढेच नाही तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्या रहिवाशाला त्यांचा फोन नंबरही दिला आणि सांगितले की जेव्हा तुम्हाला कशाचीही गरज असेल तेव्हा तुम्ही कॉल करू शकता. यावेळी शाह यांनी स्थानिक लोकांसोबत चहाचा आस्वादही घेतला. या संबंध भेटीमध्ये शहा यांनी गृहमंत्री असल्याची कुठलीही बंधने न बाळगता, स्थानिकांशी खूपच मनमोकळेपणाने संवाद साधला. या भेटीदरम्यान शाह यांनी २४ ऑक्टोबर रोजी आयआयटी काश्मीरच्या कॅम्पसचे उद्घाटन केले.
भगवती नगर येथील सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, सरकार जम्मू -काश्मीरच्या लोकांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला विकासाचं नवं युग अवतरलं आहे असेही ते म्हणाले. जम्मूविषयी आधी अन्याय आणि भेदभाव होत होता. पण आता जम्मू, काश्मीर आणि लडाख यंचा समान विकास होण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचं त्यांनी या भेटीदरम्यान म्हटलेले आहे.
हे ही वाचा:
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ७०० वेळा धावली किसान रेल्वे
सत्र न्यायालयाने का फेटाळली समीर वानखेडेंची याचिका?
‘नवाब मलिकांच्या जावयाला पकडल्यामुळेच ते आमच्या मागे’
हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं
दरम्यान, जम्मू-काश्मीरचा विकास रोखण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. “काहींनी राज्याचा विकास रोखण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने असं काही होणार नाही याची काळजी घेतली. अनेक प्रकारचे कायदे करण्यात आले. त्यामध्ये वनअधिकार कायद्याचा देखील समावेश आहे”, असं ते यावेळी म्हणाले. “ही मंदिरांची, माता वैष्णोदेवीची, प्रेम नाथ डोग्रा यांची, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाची भूमी आहे. आम्ही कुणालाही राज्याच्या विकासाच्या प्रवासाच्या आड येऊ देणार नाही”, असं देखील प्रतिपादन अमित शाह यांनी यावेळी केलं.