केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शनिवार, १९ मार्च रोजी शहा यांनी जम्मू येथे पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जम्मू आणि काश्मीरचे नायाब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या सहा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कलम ३७० हटवल्यापासून जम्मू काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रातील दहशतवादी घटनांमध्ये घट पाहायला मिळाली आहे. २०१८ मधील ४१७ घटनांच्या तुलनेत २०२१ मध्ये २२९ घटना घडल्या आहेत. तर हुतात्मा झालेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संख्येतही घट दिसून आली आहे. २०१८ मध्ये हा आकडा ९१ होता. जो २०२१ मध्ये ४२ पर्यंत कमी झाला आहे. याबाबत अमित शाह यांनी कौतुक केले.
हे ही वाचा:
टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप
चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा
भारताच्या उज्वल परंपरांना शिक्षणात स्थान द्यायला हवे
अमित शाह यांनी दहशदवाद्यां विरोधात सक्रिय कारवाईवर भर दिला. दहशदवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान किंवा आर्थिक मदत नाकारली गेली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर त्यांनी सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रभावी दहशतवादविरोधी कारवाया आणि तुरुंगातून दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वेळोवेळी समन्वय सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. नार्को दहशतवाद म्हणजेच अंमली पदार्थांच्या आडून होणाऱ्या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिक मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत.