केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कायदा आणि सुव्यवस्थेशिवाय जीडीपीत वाढ शक्य नाही असे दिल्ली पोलिस मुख्यालयात बोलताना सांगितले. यावेळी प्रत्येक पोलिस ठाण्याला पाच लक्ष्य निर्धारीत करून आपली कामगिरी २०२२ पर्यंत देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपली कामगिरी सुधारण्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा: आंदोलनकर्त्यांनी दिल्लीचा वीजपुरवठा कापावा- खलिस्तानी संगठना, एसएफजे
दिल्ली पोलिस मुख्यालयात बोलताना, अमित शहा म्हणाले की, ते पोलिस महासचिव एस एन श्रीवास्तव यांच्याशी मार्चमध्ये चर्चा करून या ध्येयांचा आढावा घेतील. दिल्ली पोलिसांची १५ जिल्ह्यात पसरलेली १७८ पोलिस ठाणी आहेत. त्यानंतर शहांच्या अध्यक्षतेखाली गणतंत्र दिवसाच्या सुरक्षेबाबत बैठक पार पडली.
दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांना राजधानी क्षेत्रात २६ जानेवारी रोजी निदर्षने करण्यास येण्याबद्दल परवानगी देण्याविषयी निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहांची ही बैठक पार पडली. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली काढण्याचे योजिले आहे. याबरोबरच दिल्ली पोलिसांकडे राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासाची सुरक्षा पाहण्याची देखील जबाबदारी असते.
शेतकऱ्यांच्या चालू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देथ शहा यांनी पोलिसांचे कौतूक केले आहे. पोलिसांनी ही परिस्थिती उत्तमरितीने हाताळली असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. याबरोबरच मागे ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या वेळेस देखील पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे शहा यांनी कौतूक केले.
“ईशान्य दिल्लीतील हिंसाचार असो वा कोरोनाच्या उद्रेकानंतर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असो किंवा अनलॉकची प्रक्रिया असो किंवा स्थलांतरित कामगारांचे विस्थापन असो या सगळ्या काळात दिल्ली पोलिसांनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे” असे शहा म्हणाले.
मागील वर्षी दिल्लीत झालेल्या दंगलीत ५३ लोकांचा बळी गेला आणि अनेक लोक जखमी झाले.
गुन्हे आणि गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अमित शहांनी दिल्ली शहरात १५,००० सीसीटीव्ही लावणार असल्याची घोषणा केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखून दिल्लीला सुरक्षित करण्याची योजना आखली आहे. कोविड-१९ आजाराची ८,००० दिल्ली पोलिसांना लागण झाली असताना आणि त्यातले ८० दगावले होते, याचा उल्लेख करून शहा यांनी पोलिसांनी वृद्ध नागरिकांना कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतूक केले.
गृहमंत्र्यांनी न्याय वेगाने मिळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबद्दल देखील सुचवले. शहा यांच्यामते गुन्हा रोखण्यासाठी गुन्हेगारा जरा सबळ पुरावे देऊन न्यायालयासमोर उभं केलं, आणि त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल कडक शासन झाले तर इतर गुन्हेगारांवर धाक बसेल. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (एनएफएसयु) सोबत सहकार्य करार केला असल्याचे देखील शहांनी सांगितले.
याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनएफएसयुचे ११९ अधिकारी दिल्ली पोलिसांना त्यांच्या गुन्हे अन्वेषणाच्या कार्यात मदत करतील. त्यामुळे दोषी ठरवण्याच्या प्रमाणात वाढ होईल.