नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. प्रथमच केंद्रात सहकार खाते तयार करण्यात आले असून अमित शहांचा या क्षेत्रातील दांडगा अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे हा भार सोपविण्यात आल्यामुळे या क्षेत्राला आणखी गती प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने अमित शहा यांनी या क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधण्यास सुरुवातही केली आहे.
नुकतेच मोदी यांनी मंत्रिमंडळामध्ये नवे बदल केले आहेत. या बदलानुसार आता केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी आता अमित शहा यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे आता या सहकार क्षेत्रामध्ये आता अधिक हितकारक निर्णय कसे घेता येतील याकडे अमित शहा यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
शहा यांनी अजूनही नवनिर्मित सहकार मंत्रालयाचा पदभार स्विकारलेला नाही. परंतु शहा यांनी सहकार क्षेत्रातील दिग्गजांना मात्र भेटीचा सपाटा आता चालवला आहे. इफ्को आणि कृभको यांसारख्या सहकारी संस्थांनी बियाणे उत्पादन आणि सेंद्रिय शेती या क्षेत्रात काम करावे, असे शहा यांनी बैठकीनंतर मत व्यक्त केले. याकरता आता पडीक असलेल्या ३८ हजार हेक्टर जमिनीचा वापर करावा असे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्य म्हणजे देशातील सहकार चळवळीला अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार बांधिल असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा
गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा विशेष गाड्या सोडा!
मध्यावधी निवडणूक झाली तर ठाकरे सरकार धाराशाही होईल
शेतकरी उत्पादन संस्थाना आता मिळणारी सवलत आता प्राथमिक कृषी संस्थानाही देण्यात येईल, असे शहा यांनी मत व्यक्त केले. शहा यांनी नुकतेच एक ट्विट केले या माध्यमातून त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यात येईल असेही म्हटले आहे.