26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणचार राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार

चार राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक निकालानंतर चार राज्यात भाजपा सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. तर पंजाबमध्ये भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशभर सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. यापैकी चार राज्यांचे मतदान पूर्ण झाले असून उत्तर प्रदेश मधील शेवटच्या टप्प्याचे मतदान बाकी आहे. उत्तर प्रदेश मधील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे एकूणच या सर्व निवडणुकांबाबत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली असून यावेळी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करत असल्याचा दावा शहा यांनी केला आहे. तर पंजाब मध्ये देखील पक्षाचे सादरीकरण अपेक्षेपेक्षा चांगले होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अमित शहा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारतातले आजवरचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रियतेचा सर्वाधिक उंचीवर असून त्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत होतोय असे अमित शहा म्हणाले.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला

युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी

…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न

शेतकऱ्यांचे मरण हेच का महाविकास आघाडी सरकारचे धोरण

तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील भाजपाचे सरकार यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांमुळे जनता भाजपाला मतदान करत असल्याचेही शहा यांनी सांगितले. बुथ अध्यक्षा पासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत, चारही राज्यातील मुख्यमंत्र्यांपासून ते इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेता, कार्यकर्ता यांनी वैज्ञानिक पद्धतीने निवडणुकीचा प्रचार केला असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. तर यावेळी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहवल्याचेही त्यांनी सांगितले.

जगत प्रकाश नड्डा यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा एकतर्फी विजय मिळवत असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशात अटीतटीच्या लढाईचा प्रश्नच उद्भवत नाही. उत्तर प्रदेशात भाजपा एकतर्फी सत्तेत येईल आणि बाकीच्या राज्यातही भाजपाचे सरकार बनेल असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला आहे. तर पंजाबमध्ये भाजपाला अपेक्षापेक्षा जास्त यश मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. आजवर पंजाबमध्ये भाजपाने युती धर्माचे पालन केले होते. पण यावेळी पहिल्यांदा भाजप ६५ पेक्षा जास्त ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि त्याचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप चांगले येणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा