अमित शहांनी बडगा उगारला, यादव, टीकैतसह अनेकांवर एफआयआर

अमित शहांनी बडगा उगारला, यादव, टीकैतसह अनेकांवर एफआयआर

दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारी २०२१ ला घडलेल्या प्रकारासंदर्भात अनेक आंदोलनकर्त्यांवर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने राकेश तिकैट, योगेंद्र यादव, दर्शन पाल, राजिंदर सिंग, बुटा सिंग बूर्जगील आणि जोगिंदर सिंग उग्रहान या नावांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत आंदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा काढून खलिस्तानी झेंडा लावला गेला. लाल किल्ल्यावरून पोलिसांना ढकलून देण्यात आले. लाल किल्ल्यावरील लहान मुलांना देखील त्यांनी सोडले नाही. काही पोलिसांना बंदी बनवण्यापर्यंत देखील त्यांची मजल गेली होती. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार १२४ पोलीस या हिंसाचारात जखमी झाले आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या आठ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर अनेक खाजगी वाहनांचीही नासधूस केली गेली आहे. कृपाण, तलवारी आणि परशू हाती घेऊन निहंग शीख घोड्यांवर स्वर होऊन पोलिसांवर तुटून पडले. या सर्व प्रकाराविरुद्ध समाज माध्यमांमधून आणि माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रया उमटू लागल्या.

या प्रकरणात २५ जानेवारी रोजी या सर्व नेत्यांनी ना हरकत प्रमाणपत्र पोलिसांकडे दिले होते. त्या प्रमाणपत्रांचे उल्लंघन केल्या प्रकरणी या नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version