बालाकोटवरील हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाचे कौतूक केले. या दिवशी हवाई दलाने पुलवामा हल्ल्याबद्दल दिलेल्या प्रत्युत्तरातून दहशतवादाबद्दलचे नव्या भारताचे धोरण स्पष्ट केले असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले आहे की या दिवशी २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाने नव्या भारताचे दहशतवादाविरुद्धचे धोरण स्पष्ट केले.
2019 में आज ही के दिन @IAF_MCC ने पुलवामा आतंकी हमले का जवाब देकर नए भारत की आतंकवाद के विरुद्ध अपनी नीति को पुनः स्पष्ट किया था।
मैं पुलवामा के वीर शहीदों का स्मरण व वायु सेना की वीरता को सलाम करता हूँ।@narendramodi जी के नेतृत्व में देश व हमारे जवानों की सुरक्षा सर्वोपरि है।
— Amit Shah (@AmitShah) February 26, 2021
शहा यांनी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना असेही म्हटले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील जवान सुरक्षित आहेत.
दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा जवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर काहीच दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील जैश-ए-मोहम्मदच्या विविध तळांवर जोरदार हल्ले करून ते तळ उध्वस्त केले होते.
हा हल्ला २६ फेब्रुवारीच्या पहाटेच करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानने जम्मूतील भारतीय तळांना लक्ष्य करण्यासाठी केलेला प्रतिहल्ला भारताच्या जगरूक असलेल्या हवाई दलाने विफल केला होता.
या वेळी झडलेल्या चकमकीत भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याचे मिग-२१ बायसन विमान पीओके ओलांडून गेले. त्याठिकाणी त्याचे विमान पाडण्यात आले होते. त्यानंतर काही काळ अभिनंदन वर्धमान पाकिस्तानी कोठडीत बंदिस्त होते, मात्र त्यांची सुटका करण्यात आली. भारताने देखील पाकिस्तानची विमाने पाडली होती.