मुख्यमंत्री राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, आमच्याशी दोन हात करा!

मुख्यमंत्री राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, आमच्याशी दोन हात करा!

गृहमंत्री अमित शहा यांनी फुंकले रणशिंग

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मात्र सत्ता हा आमचा अधिकार आहे आणि तो मी कोणत्याही परिस्थितीत मिळवणारच असे म्हणत आहे. जर या सरकारमध्ये हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि करावे आमच्याशी दोन हात. तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी पुण्यातील सभेत भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात घणाघात केला. एकप्रकारे अमित शहा यांनी प्रचाराचे रणशिंगच या सभेच्या निमित्ताने फुंकले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात भाजपाने प्रचाराचा धडाका उडविला आहे.

हे सरकार एक ऑटो रिक्षा आहे. तीन चाकांचे सरकार आहे. ती तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला जात आहेत, पण तेवढेच नाही तर या ऑटोची चाकेही पंक्चर आहेत. केवळ धूर सोडणारी ही ऑटो आहे, अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘डीबीटी’ केले. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. त्यातून गरीबांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात. पण महाविकास आघाडीने याची नवी व्याख्या केली. डी काँग्रेसने घेतला डिलर म्हणून, शिवसेनेने बी घेतला ब्रोकर म्हणून तर एनसीपीने ट्रान्सफर. असले सरकार हवे आहे का याचा विचार करा. भाजपा तर सज्ज आहे. महाराष्ट्रातील जनताही हिशोब करेल.

अमित शहा यांनी सांगितले की, हे लोक महागाईबद्दल ओरडत होते. मोदींनी डिझेल पेट्रोलच्या किमती घटविल्या. भाजपाशासित राज्यांनी आणि इतरांनीही भाव कमी केले. पण यांनी नीट ऐकले नाही की काय माहीत नाही. यांनी दारू स्वस्त केली. अहो, दारू स्वस्त करायची नव्हती पेट्रोल डिझेल करायचे होते. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल का कमी झाले नाही,  याचे उत्तर लोकांनी मागावे.

भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात ते म्हणाले की, महाराष्ट्रातील या सरकार विरोधात जनतेत जावे लागेल, हे सरकार जनतेचे कल्याण करू शकते का, हा सवाल विचारा. स्वातंत्र्यानंतर देश पुढे होता. देशाचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. उद्योग, उत्पादन, निर्यात, कर,कृषिउत्पादन दूध उत्पादन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राने नेतृत्व केले पण हे महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला हे वैभव देतील का?

अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आम्हाला लोकांकडे जावे लागेल.हे सरकार निकम्मे आहे पण या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महानगरपालिकेच्या निकालातून होईल. त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष्य ठेवू नका. परिश्रम करा. प्रत्येक मतदाराला बूथपर्यंत न्या, मतदार कमळावर शिक्का मारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला शांतता नाही. कमळाला विजयी करण्याचा निश्चय करा.

हे ही वाचा:

व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना

‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’

गोवा मुक्ती संग्रामात वीरमरण आलेल्या संघ स्वयंसेवकांची गोष्ट

केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या सचिवांची हत्या

 

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित शहा म्हणाले की, तुम्ही कार्यकर्ते पक्षाचे भविष्य आहात. तेव्हा बूथचे महत्त्व ओळखा. मी निवडणूक लढलो होतो तेव्हा मोदी राष्ट्रीय सचिव होते. ते आले होते मीटिंगसाठी. अमितभाईंना जिंकविण्याची गरज नाही, असे म्हणाल्यावर मला आश्चर्य वाटले होते. प्रत्येक बूथ कार्यकर्त्याने आपल्या बूथला विजयी करावे, असे मोदी म्हणाले तेव्हा मोदींच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला. पक्ष आज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरला आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे कार्यकर्त्यांनी पराक्रम केला. बूथ अभियान हा निवडणूक जिंकण्याचा मार्ग आहे. या अभियानातूनच निवडणूक जिंकता येईल.

Exit mobile version