शनिवारी नागालँडमध्ये हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आणि यामध्ये १४ निष्पाप ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले असून या सर्व प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये निवेदन दिले आहे.
ओटिंग, मोन येथे अतिरेक्यांच्या हालचालींची माहिती लष्कराला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने कारवाई केली. मजुरांच्या गाडीला थांबण्याचा इशारा सुरक्षा दलाच्या जवानांनी दिला होता. मात्र, वाहन न थांबता वाहनाने वेगाने जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहनात दहशतवादी आहेत या संशयावरून हा गोळीबार करण्यात आला, असे स्पष्टीकरण अमित शहांनी दिले आहे.
हे ही वाचा:
मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार दुरावण्याच्या भीतीतूनच नार्वेकरांचे ट्विट
विक्रमवीर अजाझ पटेलने एमसीएला दिली ही अनोखी भेट
चैत्यभूमीवर अनुयायी आक्रमक; दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदला!
शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्षांनी स्वीकारला हिंदू धर्म…वाचा सविस्तर
या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या होत्या. ठार झालेले पीडित हे मजूर होते. त्यांचे काम झाल्यावर हे मजूर पिक अपमधून त्यांच्या घराकडे जात होते. या मजुरांच्या गाड्या थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र, गाड्या थांबल्या नाहीत आणि गाडीत दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलाकडून गोळीबार करण्यात आला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या घटनेचा निषेध केला असून गोळीबारादरम्यान नागरिकांचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले. या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले असून या चौकशीत दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे अमित शहांनी म्हटले.