23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणफडणवीस-शहा भेटीत काय होणार?

फडणवीस-शहा भेटीत काय होणार?

Google News Follow

Related

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते दाखल होत आहेत. अनेक भेटीगाठींचे सत्र सुरु झाले आहे. या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु असतानाच आज सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शाह आणि फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे खासदार रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजपा काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजपा समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपामध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

रंगकर्मींना खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले

रेल्वेशी चर्चा न करताच ठाकरे सरकारची घोषणा

अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?

उद्धव ठाकरेंच्या प्रेरणेने तलवार नाचवली

चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत येण्याविषयीचं कारणही स्पष्ट केलं. पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. त्यांच्या मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेच. पण दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही, असं सांगतानाच या मंत्र्यांची खाती समजून घेतली. त्याचा राज्याला कसा फायदा होईल, यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा