पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामागे भवानीपूरमध्ये सुरु असलेला भाजपाचा झंझावाती प्रचार कारणीभूत असल्याचं समजत आहे. आज याच भवानीपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘डोर-टू डोर’ अभियान राबवले. म्हणजेच भवानीपूरमध्ये अमित शाहांनी घरोघर जाऊन प्रचार केला.
Union Home Minister and BJP leader Amit Shah holds a door-to-door campaign in Bhawanipur of Kolkata, ahead of the fourth phase of #WestBengalPolls pic.twitter.com/vctmISitlp
— ANI (@ANI) April 9, 2021
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून निवडणूक लढवणार असून भवानीपूरमध्ये सोभनदीप चट्टोपाध्याय हे निवडणूक लढवणार आहेत. ममता बॅनर्जींच्या भवानीपूर मतदार संघाला भाजपाने लक्ष्य केलं होतं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी डिसेंबर महिन्यात बंगालचा दौरा केला होता. या दौऱ्यावर असताना त्यांनी भवानीपूर मतदारसंघालाही भेट दिली होती. भवानीपूर मतदारसंघामधील लोकसंख्येचे बदलते गणित लक्षात घेणे गरजेचे आहे. या मतदारसंघात गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची संख्या ही ५०-६० टक्क्यांच्या जवळपास आहे. ममता बॅनर्जी या गेली अनेक वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेष करून गृहमंत्री अमित शाह यांना गुजराती असल्यामुळे ‘बाहरी’ असल्याचे ठरवत आहेत. अशावेळी गुजराती आणि मारवाडी मतदार बहुसंख्य असलेल्या मतदार संघातून निवडणूक लढवणे ममता बॅनर्जींना योग्य वाटले नाही यात काही नवीन नाही.
हे ही वाचा:
भवानीपूरमध्ये तृणमूलच्या गुंडांचे शेवटचे प्रयत्न उघड
महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही
१४९ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण नाही
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची पारंपरिक जागा अमेठी सोडून केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींचा पराभव झाला होता. या निवडणुकीत ममता बॅनर्जी नंदीग्राममधून तरी जिंकतात का? हे पाहणे रोचक ठरणार आहे.