25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण‘पुढील ३० वर्षे पंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचेच वर्चस्व’

‘पुढील ३० वर्षे पंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचेच वर्चस्व’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सुमारे १८०० राजकीय नेत्यांसमोर राज्यात १५० जागा जिंकण्याचा संकल्प बोलून दाखवला. यावेळी काँग्रेसला आपण रोखल्यास पुढील ३० वर्षांपर्यंत मध्य प्रदेशातील पंचायती आणि संसदेपर्यंत भाजपचाच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमित शहा यांनी यावेळी पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेलाही सुरुवात केली.

‘मध्य प्रदेशचे कार्यकर्ते अनुभवी आहेत. त्यांच्याकडे दीर्घ अनुभवाची शिदोरी आहे. मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकल्याही आहेत आणि जिंकूनही दिल्या आहेत. आम्ही आता कोणत्याही पदावर असलो तरी आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळेच ही निवडणूक भारताच्या भविष्याची निवडणूक आहे. भारतमातेच्या वैभवाला पुन्हा शिखरावर नेण्याची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून कोट्यवधी गरीब जनतेच्या आयुष्यात पुन्हा जनसंघाचा दीप प्रज्ज्वलित करण्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीत १५० जागा जिंकून आपल्याला काँग्रेसला पराभूत करायचे आहे,’ असे आवाहन अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.

हे ही वाचा:

स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद

ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !

देशभरातील जमीन व्यवहारांत मुंबई अव्वल

‘भाजपची विजय मोहीम अद्याप संपलेली नाही. जेव्हा संपूर्ण जग भारत मातेचा जयजयकार करेल, तेव्हाच हे लक्ष्य साध्य होईल. मध्य प्रदेशचे कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी बनले आहेत. विजय मिळवणे हा तुमचा स्वभाव आहे. तुमचा पराक्रम आहे आणि विजयच तुमचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. ३० वर्षांपर्यंत पंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचाच भगवा फडकत राहील, अशी ग्वाही मी तुम्हाला देतो,’ असे शहा यांनी सांगितले. ‘येथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निवडणूक जिंकण्याची आणि जिंकून देण्याची क्षमता आहे. तुम्हाला काही शिकवण्याची गरजच नाही. केवळ आठवण करण्याची आवश्यकता आहे. हनुमानासारखे तुमच्या शक्तीला ओळखा,’ असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा