पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एका मुलाखतीदरम्यान आरोप करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल सिंग यांच्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सत्यपाल सिंग यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमित शहा यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात सांगितले की, सत्यपाल सिंग यांच्या विधानांबाबत जनतेने विचार केला पाहिजे. जर सत्यपाल सिंग म्हणत आहे ते सत्य आहे तर मग ते राज्यपाल असताना का गप्प होते? जेव्हा ते राज्यपाल होते तेव्हा त्यांनी या विषयावर बोलायला हवे होते. अमित शहा म्हणाले की, सत्यपाल जे बोलत आहेत ते सार्वजनिक चर्चेचा विषय नाहीत.
अमित शहा यांनी सत्यपाल सिंग यांच्यावर आरोप केला की, आमची साथ सोडल्यानंतरच त्यांना या सगळ्या गोष्टींवर बोलण्याची गरज का वाटली? जेव्हा सत्तेत असतात तेव्हा यांचा अंतरात्मा जागृत का नसतो?
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी
साईभक्तानो शिर्डीत साईबाबाला हार, फुले अर्पण करा!
चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर
आव्हाडांचा हिंदूद्वेष पुन्हा उफाळला; भाजपाकडून संताप
अमित शहांनी सांगितले की, मी जनतेला हे जरूर सांगू इच्छितो की, भाजपाच्या सरकारने असे काहीही केलेले नाही जे त्यांना लपवावे लागेल. जेव्हा कुणी आमच्यापासून वेगळे झाल्यावर काही आरोप करतो तेव्हा त्याचे मूल्यांकन मीडियानेही करायला हवे आणि जनतेनेही केले पाहिजे. जेव्हा तुम्ही पदावर नसता तेव्हा आरोपांचे मूल्य आणि मूल्यांकन दोन्ही घसरतात.
जेव्हा सत्यपाल सिंग यांना राज्यपाल म्हणून निवडण्यात आले तेव्हा तुम्हाला वाटले का की तुम्ही अयोग्य व्यक्तीला निवडले आहे? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले की, ते प्रदीर्घ काळ पक्षात राहिलेले आहेत. राजनाथ सिंह भाजपाचे अध्यक्ष असताना ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत. आमच्या कोअर टीममध्येही ते होते. राजकारणात असे होते. पण एखाद्याने आपली दिशा बदलली तर आपण काहीही करू शकत नाही.
सत्यपाल काय म्हणाले होते?
जम्मू काश्मीर राज्य पुनर्निमाण आणि पुलवामा हल्ला यादरम्यान सत्यपाल मलिक राज्यपाल होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पुलवामामध्ये जो सैनिकांचा ताफा रस्तामार्गाने न जाता विमानमार्गाने जायला हवा होता. गृह मंत्रालयाकडे आपण विमानांची मागणी केली होती पण मंत्रालयाने ती मागणी फेटाळली. केवळ पाच विमानांची त्यांना गरज होती ती दिली गेली नाहीत. पंतप्रधानांबद्दल ते म्हणाले होते की, तेव्हा पंतप्रधान जिम कॉर्बेट अभयारण्यात होते, तेव्हा त्यांनी तिथून मला फोन लावला आणि मी त्यांना म्हटले की हे आपल्या चुकीमुळे झाले आहे. तेव्हा पंतप्रधान मला म्हणाले होते की, तुम्ही गप्प राहा, कुणाशीही यासंदर्भात बोलू नका. मलिक यांनी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा उल्लेख करत म्हटले की, तेव्हा आमच्या लक्षात आले की, सरकार या सगळ्याचे खापर पाकिस्तानवर फोडणार आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत फायदा मिळू शकतो.