तिरुवनंतपुरम केरळ येथे कार्यक्रमात बोलताना भारताचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी काँग्रेस, डाव्या पक्षांवर सडकून टीका केली. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कशी प्रगती केली आहे, त्याचाही उल्लेख त्यांनी केला.
एका बंदिस्त सभागृहात झालेल्या या भाषणात शहा म्हणाले की, भगवान पद्मनाभ यांच्या नगरीत मी आलो आहे. मला याचा प्रचंड आनंद वाटतो आहे. काल भारताच्या संरक्षण सज्जतेसाठी एक महत्त्वाचा दिवस होता. केरळच्या सागर किनाऱ्यावर भारतात तयार करण्यात आलेले विक्रांत जहाज राष्ट्राला समर्पित करण्यात आले. आपल्या वैभवशाली संस्कृतीचा गौरव करणारा हा सोहळा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचा ध्वज समर्पित करण्यात आला.
शहा म्हणाले की, देशभरात भाजपाचे काम करण्यासाठी देशभक्ती हवी. पण केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीसोबतच बलिदान आणि शौर्य अशा तिन्ही गोष्टींची तयारी ठेवावी लागते. केरळमध्येही कमळाचे निशाण फडकणार आहे तो दिवस दूर नाही. संपूर्ण देशातून जनमानसातून काँग्रेस आणि जगातून कम्युनिस्ट पार्टी लुप्त होत चालली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपालाच आता भवितव्य आहे.
हे ही वाचा:
‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’
पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…
‘एनआयए’ने दाऊदची लायकीच काढली !
१३ कोटींच्या गोळ्या गिळणाऱ्याला विमानतळावर केली अटक
नण्याची परवानगी दिली. तेव्हा संसदेत जात असताना संसदेच्या पायऱ्यांना त्यांनी वंदन केले आणि हे सरकार दलितांचे आहे, मागासलेल्या समाजाचे सरकार आहे असे त्यांनी म्हटले होते.
शहा यांनी जाब विचारला की, मी काँग्रेस पक्षाला विचारू इच्छितो. कधी आपल्या मंत्रिपरिषदेत १२ मंत्री अनुसूचित जातींचे कधी राहिले आहेत का? हे काम भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली केले आहे. पहिल्यांदा जेव्हा भाजपाला देशाचा राष्ट्रपती निवडण्याची संधी मिळाली तेव्हा आम्ही पहिला राष्ट्रपती दलित समाजातील नेते रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती केले. जेव्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली तेव्हा एसटी समाजातील महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केले.
शहा यांनी सांगितले की, काँग्रेस, कम्युनिस्ट यांनी दलित, आदिवासी आणि मागास जातीतील लोकांचे कधीही कल्याण केले नाही फक्त त्यांची मते घेतली. नरेंद्र मोदी यांनी १० कोटी लोकांना मुद्रा योजनेत लोन दिले. त्यात ५० टक्के दलित समाजातील लोक आहेत. उज्ज्वला योजनेत गॅस सिलिंडर हे ९ कोटी लोकांना दिले गेले. ५ कोटी एसटी, एससी समाजातील लोकांना हे सिलिंडर दिले गेले. स्वच्छ भारत योजनेत ११ कोटी शौचालय बनवले आणि त्यातील ५ कोटी ५० लाख शौचालय एसटी आणि एससी समाजातील लोकांसाठी बनवले गेले.
गरीबांबद्दल बोलणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाला आणि गरिबी हटाओ म्हणणाऱ्या काँग्रेसला गरीबांसाठी तुम्ही काय केले, हे विचारावे लागेल. दलित समाजासमोर याचा हिशेब तुम्ही द्यावा. काँग्रेसचे शासन होते तेव्हा आंबेडकर यांना भारतरत्न मिळाले नाही. ते सरकार गेले तेव्हा भारतरत्न दिले गेले. १४ एप्रिलला राष्ट्रीय समरसता दिवस घोषित करून आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असेही शहा म्हणाले.