शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षावर आरोप केले होते. त्यावर भाजप नेत्यांनीही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील आमदार अमित साटम यांनी राऊत यांना खुले आव्हान दिले आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी राऊतांना चांगलेच फैलावर धरले आहे.
काय म्हणाले अमित साटम ?
संजय राऊत्यांनी किरीट सौमय्या यांना दिलेल्या घरात घुसून मारण्याची धमकीवर आमदार अमित साटम यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. जनाब मुंबई काय तुमची जहागीर नाही. घरात घुसायची भाषा तुम्ही करता पण तुमच्या घरात तुमची काय किंमत आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार मध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या ‘काशिदा’ सारखीच आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो भ्रष्टाचार बाहेर काढला की किरीट भाईंवर भेकड हल्ले करायचे. आता प्रवीण राऊत यांना अटक झाल्यानंतर तुमचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे हे आम्हाला माहिती आहे. हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण, तुमच्याच भाषेत बोलायचे तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातील ताकद काय आहे हे पाहायला या! हे या मराठ्याचं खुलं आव्हान आहे. असा इशारा साटम यांनी राऊतांना दिला आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!
ईडीच्या भीतीने संजय राऊतांची आगपाखड
संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते
दरम्यान, मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची ताकद पहा असे म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले आहे. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हला नागपूरलाही जात येणार नाही असा थेट इशारा राऊतांनी दिला.