‘अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये घेतलं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं’

‘अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये घेतलं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं’

तब्बल साडे आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते आणि आमदार अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आता थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र शासनाचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून घेतलं याचे उत्तर नवाब मलिक यांना मंत्री करणाऱ्या नेत्यांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. दाऊद इब्राहीम आणि त्याचे जे हस्तक आहेत त्यांच्या मालमत्ता यांनी विकत घेऊन शिवाय दहशतवादी कारवाई, टेरर फंडिंग मध्ये यांचा सहभाग होता. अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होती, अशी घाणाघाती टीका अमित साटम यांनी केली आहे.

वोरा कमिटीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे. जनतेला कळायला हवं १९७९ ते १९८३ या काळात कुठल्या मोठ्या नेत्याला अंडरवर्ल्डकडून ७२ कोटी रुपये प्राप्त झाले होते. देशातील कोण दोन माजी मुख्यमंत्री होते. ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि ज्याची नोंद या कमिटीच्या अहवालात केलेली आहे. या देशातले कोण आयटीचे ऑफिसर्स होते, इन्कमटॅक्सचे ऑफिसर्स होते ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते. तसेच दिल्लीमधील कोण मोठे नेते होते ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते हे जनतेसमोर यायला हवे, अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.

हे ही वाचा:

‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’

ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?

ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यावर त्यांना जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर नवाब मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात देखील हालचालींना वेग आला आहे. नवाब मलिक यांना केलेल्या अटकेनंतर सरकारमधील नेत्यांमध्ये बैठका होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Exit mobile version