आगामी पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होईल त्याला पूर्णपणे महापालिकेत २५ वर्ष सत्ता उपभोगणारे सत्ताधारी जबाबदार असतील असे म्हणत भाजपा नेते आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नालेसफाईच्या कामावरून त्यांनी बीएमसीच्या कारभारावर तोफ डागली आहे.
साधारणतः फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामाचे टेंडर काढले जातात. टेंडरच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अंदाजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या कामाला सुरुवात होते. पण यंदाच्या वर्षी मार्च महिना संपत आला तरी अद्यापही या नालेसफाईच्या कामांची टेंडर काढण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या नालेसफाईच्या कामांना उशीर होणार आहे.
हे ही वाचा:
‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल
‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’
आसाम, मणिपूर, नागालँडमधील AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय
कर्नाटकात हलाल मांसवर बंदी घालण्याची मागणी
स्थायी समितीच्या शेवटच्या मिटिंगमध्ये ७० मिनिटात साडे सहा हजार कोटींचे प्रस्ताव पारित झाले. परंतु मुंबईच्या नालेसफाईचे प्रस्ताव ‘नॉट टेकन’ करण्यात आले. एप्रिलच्या मध्यात हे काम सुरु होणार नसल्याने मुंबईची पुन्हा तुंबई झाली तर याची पूर्ण जबाबदारी २५वर्ष राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची असणार आहे असे साटम यांनी म्हटले आहे.
या सर्व कारभारावरूनच मुंबई भाजपचे सरचिटणीस आमदार अमित साटम आक्रमक झाले असून त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. स्टॅंडिंग कमिटीच्या बैठकीत असे कोणते अंडरस्टँडिंग झाले नाही ज्याच्यामुळे ही टेंडर काढण्यात आली नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पावसाळ्यात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून मुंबापुरीचे मुंबापुरी होण्याची चिन्हे आहेत.
स्थायी समितीच्या मिटिंगमध्ये ७०मिनिटात साडे सहा हजार कोटींचे प्रस्ताव पारित झाले परंतु मुंबईच्या नालेसफाईचे प्रस्ताव नॉट टेकन करण्यात आले. एप्रिलच्या मध्यात हे काम सुरु होणार नसल्याने मुंबईची पुन्हा तुंबई झाली तर याची पूर्ण जबाबदारी २५वर्ष राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची असणार आहे. pic.twitter.com/8y7ib1QFLo
— Ameet Satam (@AmeetSatam) March 31, 2022