‘२५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत ३ लाख कोटींपेक्षा अधिक भ्रष्टाचार’

‘२५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत ३ लाख कोटींपेक्षा अधिक भ्रष्टाचार’

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरावर शुक्रवारी २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर विरोधकांनी महानगर पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला होता. भाजप आमदार अमित साटम यांनी देखील आता मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारावर सडकून टीका केली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून १८० प्रस्ताव सुमारे २ हजार कोटींचे आणण्याचे प्रायोजित आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिली आहे. जणू काही मुंबई महानगर पालिकेतून आपली सत्ता जाणार आहे आणि उरलेल्या बैठकीमध्ये मुंबईकरांचा जेवढा पैसा ओरबाडता येईल तेवढा ओरबाडायचा प्रयत्न करणे हे त्याच्या मागे उद्देश्य आहे, असा खोचक टोला अमित साटम यांनी लगावला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट कंत्राटदार यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. त्यातून जी आकडेवारी बाहेर येत आहे की, गेल्या पाच वर्षांमध्ये ५० हजार कोटींपेक्षा जास्तीचे प्रस्ताव हे स्थायी समितीमध्ये पारित झाले होते आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता. या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार गेल्या २५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार आहे. तीन लाख कोटींपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार हा गेल्या २५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत झाला आहे.

हे ही वाचा:

एल्फिन्स्टनचा उड्डाणपूल मराठी माणूस होणार का गुल?

मुंबईची बत्ती गुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर भारताची ही भूमिका

‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर?’ या पुस्तिकेचे प्रकाशन

येणाऱ्या काळात मुंबईची जनता ही मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट सत्ताधीशांना उखडून फेकाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमित साटम यांनी दिला आहे. ही लढाई असत्याच्या विरुद्ध सत्याची आहे. अधर्मच्या विरुद्ध धर्माची आहे. अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई आहे, असे अमित साटम म्हणाले. तसेच ही लढाई आहे मुंबईकर विरुद्ध आदित्य सेना यांची देखील असल्याचे अमित साटम म्हणाले.

Exit mobile version