मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या टेंडर प्रक्रियेत २१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते अमित साटम यांनी केला आहे. मुंबई महापालिकेचा कार्यालयीन आदेश पोस्ट करताना साटम यांनी महापालिका प्रशासनावर हल्ला चढवला आहे. साटम यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा भाजपा मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.
गुरुवार, २६ मे च्या मुंबई महापालिकेच्या कार्यालयीन आदेशानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांच्याकडील मलनिस्सारण विभागाच्या प्रमुख अभियंत्याचे कामकाज अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. महापालिकेच्या या निर्णयावर भाजपा नेते आमदार अमित साटम यांनी सवाल उपस्थित केला आहे. महापालिकेने हा निर्णय नेमका का घेतला याबद्दल साटम यांना शंका आहे.
हे ही वाचा:
स्टेडियममध्ये कुत्रा फिरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला पाठवले लडाखला
अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा
‘रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?’
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन
यावेळी महापालिकेतील वाझेगिरीची पोलखोल करत असल्याचे अमित साटम यांनी म्हटले आहे. तर मुंबई महापालिकेतील वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये आहे असेही ते म्हणाले. अमित साटम म्हणतात त्याप्रमाणे खरंच मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कारभारात २१ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तर साटम यांच्या या आरोपांना महापालिका प्रशासनाकडून नेमके काय उत्तर दिले जाणार? हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.