अकबरुद्दीन ओवैसींनी पोलिसांना धमकावले

जनसमुदायाला इशारा केला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल

अकबरुद्दीन ओवैसींनी पोलिसांना धमकावले

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाचे (एमआयएम) आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे वादग्रस्त आणि भडकाऊ विधाने करण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांची पोलिसांशी घातलेली हुज्जत आणि त्यांना धमकावण्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

 

मंगळवारी अकबरुद्दीन ओवैसी यांनी हैदराबाद येथे भाषण करताना स्थानिक पोलिसांना धमकावले. नियमांचे पालन करण्यास पोलिसांनी सांगितल्यानंतर अकबरुद्दीन त्यांच्या अंगावर धावून गेले आणि पोलिसांना धमकावले. अकबरुद्दीन ओवैसींनी पोलिसांना त्वरित त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले शिवाय, आपण जर समोर बसलेल्या प्रेक्षकांना इशारा केला तर तुम्हाला इथून पळून जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा शब्दांत अकबरुद्दीन यांनी धमकावले.

 

ओवैसी हे चंद्रयानगुट्टा या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. या भागातील संतोषनगर येथे सभेत बोलत असताना पोलिसांनी त्यांना ही सभा वेळेत आटोपण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून ते भाषणात म्हणाले की, गोळ्या चाकूचा उल्लेख केला म्हणून आम्ही कमकुवत झालो असे नाही. अजूनही आमच्यात खूप हिंमत आहे. पाच मिनिटे आहेत. मी पाच मिनिटे बोलणार. कुणी माईचा लाल जन्माला आलेला नाही जो मला थांबवू शकेल. जर मी समोर बसलेल्या जनसमुदायाला इशारा केला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल.

हे ही वाचा:

साडेतीन कोटी खर्च केल्याचा आरोप हास्यास्पद!

सिजरींग करताना महिलेच्या आतड्याला पडले छिद्र!

फुप्फुसे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, तरीही चेन्नईत प्रत्यारोपण

आयसीसीकडून बंदी; ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू मॅकगेहे यांची निवृत्ती!

 

अकबरुद्दीन ओवैसी यांनी अनेकवेळा अशी वादग्रस्त विधाने केलेली आहेत. २०१२ मध्ये हिंदूंविरोधात ओवैसी यांनी आक्षेपार्ह अशी विधाने केली होती. पोलिसांना १५ मिनिटे हटवले तर हिंदूंना स्वतःला वाचवता येणार नाही, असा इशारा देताना त्यांनी हिंदू देवीदेवतांची थट्टा उडविली होती.

 

अकबरुद्दीन ओवैसी हे त्या मतदारसंघातील सर्वात श्रीमंत असे उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर अस्थायी मालमत्ता म्हणून ४.५० कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ४.९५ कोटींची मालमत्ता आहे.

Exit mobile version