23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणरेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना ठाकरे सरकारच्या मंत्र्याने केले 'हे' अजब विधान

रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना ठाकरे सरकारच्या मंत्र्याने केले ‘हे’ अजब विधान

Google News Follow

Related

कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं.

नाशिक येथे मीडियाशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली. लंडनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी आपली माणसं जगवण्यासाठी मिळेल त्या लशी घेतल्या. अमूकच लस हवी असा अट्टाहास केला नाही. लंडनच्या प्रशासनाने ती लस स्वदेशी आहे की विदेशी आहे हे काहीच पाहिलं नाही, असं सांगतानाच आपल्याकडेही लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीही हीच लस घ्या, आपल्याच देशातील लस घ्या असा आग्रह केला जात आहे. अमूकच लस कशाला? अरे, माणूस जगला पाहिजे पहिला. हीच लस घ्या, तीच लस घ्या करू नका. जी लस उपलब्ध असेल ती नागरिकांना द्या, असं भुजबळ म्हणाले. झालं गेलं विसरून आता पुढे गेलं पाहिजे. पुन्हा जोमाने लसीकरण केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?

नागपूरमधील कोरोना प्रसाराचे कारण उघड

पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

रेमडेसीवीर मिळत नसल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत, याकडे भुजबळांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, लोकं रस्त्यावर उतरणार त्याला काय करणार? अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. माझ्या घरात तर मी इंजेक्शनचा साठा केलेला नाही. कलेक्टरच्या घरातही साठा नाही आणि रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं सांगतानाच एखाद्या दुकानात जर साठा करण्यात आलेला असेल आणि मला कळलं तर तिथे जाऊन कारवाई करून इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देत असतो, असं ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा